MP Sanjay Raut | शरद पवारांविषयी आदर, म्हणून राष्ट्रवादी पक्ष फोडला का?; राऊतांची मोदींवर खोचक टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Sanjay Raut | शरद पवारांविषयी (Sharad Pawar) आदर होता, म्हणून भाजपने (BJP) राष्ट्रवादी पक्ष (NCP) फोडला का?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. मोदीजी, तुम्ही तुमच्या पक्षातील बघा, तुम्ही लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना मार्गदर्शक मंडळात का टाकले?, असाही सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसने (Congress) त्यांना डावलले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र एनडीएची बैठक (NDA Meeting) पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मोदींच्या वक्तव्यानंतर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे.

एनडीएच्या बैठकीत बोलताना मोदींनी शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) युती तुटण्यावर भाष्य केले आहे. 2019 ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. भाजपने नाही, असेही मोदी म्हणाले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही शिवसेनेची साथ सोडली नाही, असे ते म्हणत असतील तर ते दिशाभूल करत आहेत. आपण वेगळे झालो आहोत हे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल करून सांगितले. पंतप्रधान मोदींनी काही गोष्टी तपासून बोलावे. महापुरुषांच्या साक्षीने तरी अस मोडून तोडून बोलू नये.

पुढे राऊत म्हणाले की, मोदी सामना वाचतात. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे.
त्यांना अजूनही शिवसेनेची दखल घ्यावी लागते. सामनातील भूमिका शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहे.
त्यांना यासाठी दखल घ्यावी लागते. कारण आम्ही ओरिजनल आहोत. सामना आणि ठाकरे शरण जात नाहीत.
हे त्यांनी बोलून दाखवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पुण्यातील दर काय? जाणून घ्या

BJP Leader Sana Khan | नागपुरातील भाजप महिला नेत्याची हत्या? मृतदेह मध्य प्रदेशातील हिरन नदीत फेकला