Maharashtra Rain Update | कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस; पुण्यात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यात कोकणासह (Konkan) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) परिसरात चांगला पाऊस झाला आहे. त्याचबरोबर नांदेड (Nanded), यवतमाळ (Yavatmal), गोंदिया (Gondia) जिल्ह्यांत दमदार पाऊस (Maharashtra Rain Update) झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात (Pune) आज (मंगळवार) पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

 

दोन दिवस झाले पुणे, मुंबईसह काही जिल्ह्यात पावसाचा (Maharashtra Rain Update) जोर वाढला आहे. पुण्यात आजही पहाटेपासून पावसाची रिपरिप दिसून येत आहे. राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी (Raigad And Ratnagiri) जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यातही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्याच्या (Marathwada) काही भागासह पालघर (Palghar), ठाणे आणि सातारा (Satara) जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

 

काही जिल्ह्यात पावसाची रिपरिप

गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
गोंदिया शहराजवळून वाहणाऱ्या पांगोली नदीसह अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे.
तसेच नांदेड जिल्ह्यात जवळपास 60 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली. शेतीला जसाआवश्यक आहे तसा पाऊस झाला आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यवतमाळच्या आर्णी येथे रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला.
या पावसाचे पाणी बाजार पेठेतील दुकानात शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
रात्री आर्णी शहरात जवळ पास पाच तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नाल्या तुडुंब भरले आहेत.

 

 

Web Title :  Maharashtra Rain Update | heavy rain warning in madhya maharashtra and vidarbha konkan imd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा