Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पाऊस – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय (Maharashtra Rain Update) झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai), कोकणासह (Konkan) पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), उत्तर महाराष्ट्रासह (North Maharashtra) विदर्भात (Vidarbha) पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये आगामी काही दिवसात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) देण्यात आला आहे. तसेच, आगामी 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

हवामानाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यात आगामी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईत उद्या संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परिणामी उद्यापासून मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आलाय. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता उद्यापासून आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात चांगल्या पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. (Maharashtra Rain Update)

 

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तसेच, पुण्यातील (Pune) घाट माथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा,
सांगली भागातील घाट माथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
त्याचबरोबर मंगळवारीही रत्नागिरीत चिपळूण, दापोलीत पावसाने दमदार हजेरी लावलीय.
तर दुसरीकडे मराठवाड्यात औरंगाबाद, बीड भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

 

Web Title :- Maharashtra Rain Update | maharashtra rain heavy rainfall in konkan for next 3 to 4 days rain forecast in many districts of the state imd marathi news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा