Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | राज्यात पावसाचा (Rain) जोर ओसरला असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी पावसाने (Maharashtra Weather Update) हजेरी लावली. कोकण (Konkan) आणि विदर्भासह (Vidarbha) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अनेक जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (शनिवार) राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता आहे. यामध्ये कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील रायगड (Raigad) जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने (Administration) केले आहे.

राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. त्या भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तेथे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, काही भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही, त्या ठिकाणी धरणे आणि नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे.

नगर जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीदेखील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही.
त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यात पाणी टंचाई सुरु झाली आहे.
नगर जिल्ह्यात 57 टँकरद्वारे 60 गावातील 344 वाड्यावस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे.
जवळपास सव्वा लाख नागरीकांना भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Jitendra Awhad | वाढदिवसाच्या दिवशीच आव्हाड भावनिक! “माफ करा, मी अस्वस्थ आहे… कुणालाही भेटू इच्छित नाही”

Pune-Mumbai Expressway | पुणे, मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीचा विषय संपणार; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय