Maharashtra Rains | मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा; आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Rains | गेल्या दोन दिवसापासुन पावसाने राज्यात जोर धरला आहे. आज सकाळपासुनच पावसाने (Rain)जोरदार बॅटींग सुरु केली आहे. तसेच, आता आगामी 24 तासामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता (Maharashtra Rains) वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले आहे. तर, कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकणार आहे. यामुळे पश्चिम किनारी आगामी 3 ते 4 दिवस जोराचे वारे वाहणार आहेत. म्हणुन महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार मान्सूनची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने थेमान घातले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वा-यासह दमदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) याचा प्रभाव अधिक असणार असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त घाट परिसरात देखील जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईत आजच्या तुलनेत काल (रविवारी) पावसाचा जोर दुपारनंतर कमी झाला होता. आज मात्र पावसाने जोर धरला आहे.

दरम्यान, 13 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) देण्यात आला आहे. 14 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) देण्यात आला आहे. 15 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange alert) देण्यात आला आहे. 16 सप्टेंबर रोजी मात्र पावसाचा जोर किंचित कमी होईल. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर (Krishnananda Hosalikar) यांनी दिली आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | extreme level rainfall over mumbai and konkan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health Department Circular 2021 | उपचारात दिरंगाई होऊन मृत्यू झाल्यास डॉक्टरचं होईल निलंबन

Pune News | पुणे जिल्हा बँक शेतकऱ्यांना आधार देणारी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

T-20 World Cup 2021 | विराट कोहली कर्णधार पदावरुन ‘पायउतार’ होणार; रोहित शर्मा भारताचा कर्णधार?