Maharashtra Rains | …म्हणून राज्यात वाढणार पावसाचा जोर, आगामी 5 दिवस हाय अलर्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन अरबी समुद्रासह (Arabian Sea) बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून पुणे, मुंबईसह राज्यात पावसासाठी (Maharashtra Rains) पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर केले आहे. परंतु आता आंदमानच्या समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होत आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पुढील 5 दिवस अनेक ठिकाणी पावसाची (Maharashtra Rains) शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर पुढील 5 दिवस हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे.

 

आज ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

 

आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.
पुढील काही तासात या तीन जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता आहे.
तसेच रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या 6 जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून उद्यापासून राज्यात पावसाचा (Maharashtra Rains) जोर वाढण्याची शक्यता आहे.

 

शनिवारी 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट

 

शनिवारी (दि.13) दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह (Thunderstorm and lightning) जोरदार पाऊस पडणार आहे.
हवामान खात्याने उद्या (शनिवार) सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे.
दरम्यान, वेगाने वारे वाहणार असून याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहणार आहे.

 

3 दिवस पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस

 

ऑक्टोबर महिन्यात पावसाने उघडपी घेतल्यानंतर 1 नोव्हेंबर पासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या (Rain in Maharashtra) सरी कोसळत आहेत.
नैऋत्य मोसमी पाऊस परतल्यानंतर ईशान्य मान्सूनच्या सरी पुण्यातही कोसळल्या (Rain in Pune) आहेत.
रविवारपासून (दि. 14) पुढील तीन दिवस पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवार नंतर पुढील तीन दिवस पुण्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.
या तीन दिवसांत पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार (Pune Rains) पावसाची शक्यता आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | heavy rainfall possible in maharashtra for next 5 days imd give yellow alert for 5 days mumbai pune weather

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Small Saving Scheme | पोस्टाच्या Time Deposit Account योजनेतील गुंतवणुकीतून मिळतो चांगला व्याजदर आणि TAX सवलत, जाणून घ्या

Aryan Khan | आर्यन खानसाठी शाहरुखनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

7th Pay Commission | ‘या’ 2.5 लाख सरकारी नोकरदारांना सुद्धा मिळेल मोठा महागाई भत्ता, मोदी सरकारने दिली भेट