Maharashtra Rains Update | आगामी 3 ते 4 दिवसात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस (Maharashtra Rains Update) सक्रिय झाला आहे. काही जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे तर काही जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगर आणि ठाणे (Thane) परिसरात रात्ररभर पावसानं जोर धरलाय, दरम्यान, आगामी तीन ते चार दिवसांत दक्षिण कोकणात (South Konkan) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) घाट विभागात काही भागांत पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.

 

आगामी 3 ते 4 दिवसांत दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेय त्याचबरोबर पुढील 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. पुण्यासह (Pune) पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Rains Update)

 

दरम्यान, दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात पाऊस बरसला आहे. यापुर्वी 20 जून रोजी पाऊस पडला होता.
या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अचानक बरसलेल्या पावसाने शहरातील वाहतूक कोंडी झाली असल्याची दिसली.
त्याचबरोबर समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या आहेत खोळंबल्या आहेत.
फक्त पाच टक्केच पाऊस झाल्याने बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains Update | maharashtra monsoon rain in some parts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

 

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज

 

Devendra Fadnavis | ‘भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल’ – देवेंद्र फडणवीस