Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 19164 नवे पॉझिटिव्ह तर 459 जणांचा बळी, वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात कोरेानाचे 19 हजार 164 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत तर दिवसभरात तब्बल 459 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात 17 हजार 184 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 2 लाख 74 हजार 993 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर राज्यातील बाधितांची संख्या 12 लाख 82 हजार 963 वर जाऊन पोहचली आहे.

राज्यात आतापर्यंत तब्बल 9 लाख 73 हजार 214 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनामुळं आतापर्यंत तब्बल 34 हजार 345 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.68 टक्के इतका आहे. राज्या गेल्या 7 महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. मृत्यू झालेल्या 459 नोंदीपैकी 256 मृत्यू हे गेल्या 48 तासातील आहेत तर 125 मृत्यू हे गेल्या आठवडयातील आहेत इतर 78 मृत्यू हे आठवडयापेक्षत्त अधिक कालावधीपूर्वीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट हा 75.86 टक्के इतका आहे.