Maharashtra School Education Minister Deepak Kesarkar | अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई : Maharashtra School Education Minister Deepak Kesarkar | राज्यातील अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे समायोजन आणि अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ ग्रंथपालपदी (Librarian) नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Maharashtra School Education Minister Deepak Kesarkar) यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य रामदास आंबटकर (Ramdas Ambatkar) यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री केसरकर म्हणाले की, ज्या ठिकाणी शाळांची पटसंख्या कमी आहे, अशा शाळा एकत्रित करुन तिथे पूर्णवेळ ग्रंथपाल उपलब्ध करुन देता येईल का, याचा विचार सुरु आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असून त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण देऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

याशिवाय, शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेत आहोत.
शाळांमध्ये ई- ग्रंथालय सुरु करीत आहोत. पुढील वर्षीपासून प्रत्येक शाळेत पुस्तकपेटी योजना आणि डिजीटल लायब्ररीचा उपक्रम आपण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शालेय शिक्षणात गुणात्मक फरक पडेल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), निरंजन डावखरे (Niranjan Davkhare),
अभिजित वंजारी (MLA Abhijit Wanjarri), प्रविण दरेकर (Pravin Darekar), कपिल पाटील (Kapil Patil),
भाई जगताप (Bhai Jagtap), महादेव जानकर (Mahadev Jankar), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपप्रश्न विचारले.

Web Title :-  Maharashtra School Education Minister Deepak Kesarkar | Proposal submitted to Finance Department for full-time appointment of part-time librarians – School Education Minister Deepak Kesarkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Anil Bhosale | शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण ! आमदार अनिल भोसलेंचा चौथ्यांदा जामीन फेटाळला

CM Eknath Shinde | ‘राहूल गांधींना ‘त्या’ जेलमध्ये ठेवलं पाहिजे अन् घाण्याला जुंपलं पाहिजे’, सावरकरांच्या विधानावरुन मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

Former MLA Harshvardhan Jadhav | ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधवांनी दंड थोपटले, दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणूक लढवणार