शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा ! 10 वी चा निकाल जून अखेरपर्यंत जाहीर होणार

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची (academic year 2020-21)  राज्यातील १० वीची (ssc exam) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असून १० वीचा (ssc exam) निकाल जून अखेरपर्यंत लावला जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad)  यांनी आज दिली आहे.

यावेळी त्या म्हणल्या, १० वीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार आहे. दरम्यान, सदर मूल्यमापन धोरणानुसार, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन करण्यात येईल. यामध्ये इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी, सुधारित मुल्यमापन धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ (academic year 2020-21)  साठी १० वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांवर आधारित असेल. १०० गुणांच्या मूल्यमापन पद्धतीत विद्यार्थी समाधानी नसेल, तर बोर्डाच्या २ परीक्षांच्या संधी मिळतील.

१० वी परीक्षेच्या निकालाचे निकष –

वर्षातील लेखी मूल्यमापन – ३० गुण
१० वीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – २० गुण
९ वीचा विषयानिहाय गुण – ५० गुण

 

Also Read This : 

 

चंद्रपूरातील दारुबंदी ‘उठविली’ अन् नागपूर, यवतमाळ, मध्यप्रदेशातील मद्यमाफियांचा ‘बाजार’ उठला !

 

जमिनीवर बसून जेवणाचे ‘हे’ ४ फायदे, जाणून घ्या

 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय