Homeक्राईम स्टोरीचंद्रपूरातील दारुबंदी ‘उठविली’ अन् नागपूर, यवतमाळ, मध्यप्रदेशातील मद्यमाफियांचा ‘बाजार’ उठला !

चंद्रपूरातील दारुबंदी ‘उठविली’ अन् नागपूर, यवतमाळ, मध्यप्रदेशातील मद्यमाफियांचा ‘बाजार’ उठला !

नागपूर : राज्य सरकारने गेल्या ५ वर्षापासून सुरु असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारुबंदी उठवली. त्याचे काही जणांनी स्वागत केले असून विरोधकांनी टिका केली आहे. असे असतानाच नागपूर, यवतमाळ, मध्यप्रदेशातील चंद्रपूराला (Chandrapur)  लागून आलेल्या जिल्ह्यातील मद्यमाफियांचा मात्र ‘बाजार’ उठला आहे. दारुबंदी असल्याने नागपूर, यवतमाळमधून चंद्रपूरात (Chandrapur)  दरमहा २ कोटी रुपयांच्या मद्याची तस्करी केली जात होती.

आता ती बंद होणार असल्याचे या समांतर काळ्या बाजाराला आळा बसणार आहे. या तस्करीच्या धंद्यात अनेक गुंडांच्या टोळ्यांचा सहभाग आहे. त्यांनी पोलिसांना हाताशी धरुन तस्करीची व्यवस्था लावली होती. अनेक पोलीस कर्मचारीच आलिशान वाहनांतून चंद्रपूरात मद्यसाठा पोहचविण्यासाठी मदत करत होते. मध्य प्रदेशातील मद्यही चंद्रपूरात विनासयास पोहचविले जात होते.

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारुबंदी सुरु झाली होती. त्यामुळे चंद्रपूरातील मद्यविक्रेत्यांना मोठा फटका बसला होता. बार, दारु दुकाने, वाईन शॉप बंद झाली होती. काही आपल्या परवान्यांचा वापर करुन शेजारच्या जिल्ह्यात दुकाने टाकली होती. तेथून ते चंद्रपूरात माल पोहचवत होते. दारुबंदीमुळे मद्यमाफिया व गुंडांना या तस्करीतून मोठा पैसा मिळत होता. त्यातून नागपूर, यवतमाळमधील टोळ्यांनी आपले बस्तान चंद्रपूरात हलविले होते. या गुंडांनी पोलिसांच्या साथीने एक समांतर व्यवस्थाच निर्माण केली होती. आता दारुबंदी उठविल्यामुळे हे गुंड आणि मद्यमाफियांचे या व्यवस्थाचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केल्याने राज्य सरकारला दरवर्षी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सुमारे ५०० कोटी रुपयांचा महसूलावर पाणी सोडावे लागत होते. यामुळे गेल्या ६ वर्षात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा सरकारला फटका बसला होता. दुसरीकडे चंद्रपूरात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी, सिमेंट आणि इतर मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये काम करणारा कामगार हा कामानंतर श्रमपरिहारासाठी मद्यपान करीत असे. त्यांच्या मद्यपान कमी झाले नाही. दारुबंदीमुळे अवैध दारु विक्रीला प्रचंड उधाण आले होते. गावठी दारु पिऊन अनेक जणांचा मृत्युही झाला होता.

लॉकडाऊनच्या काळात सर्व महसूल बंद असताना राज्य शासनाला राज्यभरातून दारुविक्रीतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला होता. त्यामुळे चंद्रपूरातील दारुबंदी फसली, त्याची मोठी चर्चा सुरु झाली. शासनाने या दारु बंदीचे समिक्षण आणि पूनर्विचार करण्यासाठी माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमली होती. या समितीने मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला दिला होता. त्यानुसार दारुबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या दारुबंदीवर टिकाटिप्पणी झाली तरी एक समांतर अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मोडीत निघणार आहे. दारुच्या तस्करीतून पोसली गेलेली गुंडागर्दीचा ‘बाजार’ उठणार हे नक्कीच.

 

Also Read This : 

 

Corona Vaccination : ‘कोरोना’मुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष?

 

कशामुळं घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटतं? जाणून घ्या त्याची कारणे अन् उपाय

 

Booster Dose : नव्या संशोधनानुसार खुलासा ! Covid लसीचे 2 डोस घेतल्यानंर आता ‘बुस्टर’ डोसही घेणं आवश्यक ?

 

रात्री झोपताना नाभीत टाका 5 थेंब तेल, वजन कमी करण्यासह मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

 

Pune : महिला अकाउंटटने केला कंपनीत तब्बल 11 लाखांचा अपहार; शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील घटना

 

शरीरातील उष्णता वाढल्यास करा ‘हे’ 11 सोपे घरगुती उपाय

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News