Maharashtra SSC Result 2023 | यंदाही कोकण विभागाने मारली बाजी; दहावीचा निकाल जाहीर, ‘या’ संकेतस्थळावरून बघता येणार निकाल (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra SSC Result 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (दि.2) रोजी जाहीर झाला आहे. या वर्षी राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदा देखील कोकण विभागाने (Konkan Division) बाजी मारली असून कोकण विभागाचा 98.11 टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (Nagpur Division) लागला आहे. विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली असून 95.87 % मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (Maharashtra SSC Result 2023)

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यामध्ये मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशीलही जाहीर करण्यात आले.

विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर आपले व्यक्तिगत निकाल पाहता येणार आहेत. पुणे विभागात एकूण 1240 शाळांचा निकाल 100% लागला आहे.

राज्य मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा (10th Result) 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यातील एकूण 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 लाख 33 हजार 067 मुलीचा समावेश होता. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची विद्यार्थ्यांना व पालकांना उत्सुकता लागली होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली असून आज (दि.२) सर्व विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजता संकेतस्थळावरून (SSC Result 2023 Website) निकाल बघता येणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंट काढून घेता येणार आहे. निकाल बघण्यासाठी 1. www.mahresult.nic.in 2. http://sscresult.mkcl.org. 3. https://ssc.mahresults.org.in या संकेतस्थळांचा वापर करता येईल. सर्व विद्यार्थ्यांना येत्या 14 जून रोजी शाळेंमध्ये गुणपत्रकाचे वाटप केले जाईल. (Maharashtra SSC Result 2023)

राज्यात एकूण 35 हजार 991 ग्रेस गुण विद्यार्थ्यांना मिळाले आहे. राज्यात 23 ट्रान्सजेंडर विद्यार्थी उत्तीर्ण झाले
आहे. यामध्ये 7 विद्यार्थी पुण्यातील आहेत. (Pune Division) राज्यात 7688 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदा 86,599 विद्यार्थी नापास झाले आहेत तर 33,306 विद्यार्थ्यांना ATKT लागली आहे. यावर्षी 366 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले आहेत.

Advt.

12 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करता येणार आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयापैकी
(Compulsory Subjects) (श्रेणी विषया व्यतिरिक्त) इतर कोणत्या विशिष्ट विषयांत विद्यार्थ्यांना गुणांची
पडताळणी (Verification Of Marks), उत्तर पत्रिकांच्या छायापत्र (Photocopies Of Answer Sheets),
पुर्नमुल्यांकन (Revaluation) किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी (Migration Certificate) विभागीय मंडळाकडे
ऑनलाइन किंवा शाळेमधून अर्ज करता येणार आहे. हा अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http://verificatior
यावर करता येईल. गुणपडताळासाठी 3 जून ते 12 जून पर्यंत अर्ज करता येणार आहे.
तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 22 जूनपर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट
केले आहे. (SSC Result 2023)

कोकण विभागाची उत्तीर्ण टक्केवारी सर्वात जास्त असून कोकण विभागाचा 98.11 टक्के निकाल लागला आहे.
त्यानंतर पुणे विभाग 95.64 टक्के, मुंबई विभाग 93.66 टक्के, कोल्हापूर विभागाचा 96.73 टक्के निकाल लागला आहे.
तसेच औरंगाबाद विभाग 93.23 टक्के, अमरावती 93.22 टक्के, नाशिक विभाग 92.22 तर लातूर विभागाचा 92.67
टक्के निकाल लागला आहे. विभागीय टक्केवारीमध्ये सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून 92.05
टक्के लागला आहे.

Web Title :  Maharashtra SSC Result 2023 | This year too, Konkan division win; 10th result declared, the result can be viewed from this website

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | पिंपरी-चिंचवड पोलिस : वाकड, पिंपरी विभाग आणि गुन्हे शाखेत एसीपींच्या नियुक्त्या, वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांची सांगवी पो.स्टेशनमध्ये नियुक्ती