Coronavirus : राज्यात ‘कोरोना’ विस्फोट ! गेल्या 24 तासात 60 हजार 212 नवीन रुग्ण, 281 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असताना रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ दिसत आहे. राज्यात लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने, सरकारसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात 60 हजार 212 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 31 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 28 लाख 66 हजार 097 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.44 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.66 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 5 लाख 93 हजार 398 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1लाख 18 हजार 168 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 25 लाख 60 हजार 051 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35 लाख 19 हजार 208 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.6 टक्के आहे. सध्या राज्यात 32 लाख 94 हजार 398 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 30 हजार 399 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 1,18,168, मुंबई 86098, ठाणे 81303, नाशिक 41438, औरंगाबाद 14347, नांदेड 12419, नागपूर 62527, जळगाव 11342, अहमदनगर 15642, सातारा 8623, सोलापूर 9481, रायगड 9123 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.