Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 31,671 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.24 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नवीन कोरोना Coronavirus रुग्णासंख्येचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे. राज्यात आज 20 हजार 740 नव्या कोरोना Coronavirus रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 31 हजार 671 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 93.24 टक्के इतका झाला आहे. दरम्यान आज 424 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 31 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 53 लाख 07 हजार 874 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.24 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 लाख 92 हजार 874 इतके झाले असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.64 टक्के इतके आहे.

आज राज्यात 424 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 93 हजार 198 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.64 टक्के आहे. सध्या राज्यामध्ये 2 लाख 89 हजार 088 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 43 लाख 50 हजार 186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 92 हजार 920 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21 लाख 54 हजार 976 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 16 हजार 078 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय