Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 3,198 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज 3,063 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 71 हजार 728 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.27 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 56 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 067 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 36 हजार 484 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 87 लाख 39 हजार 974 प्रयोगशाळा
नमुन्यांपैकी 65 लाख 50 हजार 856 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 45 हजार 427 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,423 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parenting | मुलांच्या समोर पालकांनी चुकूनही करू नयेत ‘ही’ 5 कामे, त्यांचे आयुष्य होईल ‘खराब’, जाणून घ्या

Pune Court | ‘या’ प्रकरणात नानासाहेब गायकवाडांसह 6 जणांचा जामीन फेटाळला; जाणून घ्या कारण आणि प्रकरण

Flipkart Big Billion Days Sale | फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलीयन डेज सेल’ मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी; मिळेल 80 % पर्यंत सवलत