Pune Court | ‘या’ प्रकरणात नानासाहेब गायकवाडांसह 6 जणांचा जामीन फेटाळला; जाणून घ्या कारण आणि प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Court | माहेरून 50 लाख रूपये हुंडा येणे बाकी असल्याने सुनेचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याप्रकरणी नानासाहेब शंकरराव गायकवाड ( Nanasaheb Shankarrao Gaikwad) यांच्यासह सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज एम.एम देशपांडे (Judge M M Deshpande) कोर्टाने (Pune Court) फेटाळला.

नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड (वय 60),  सोनाली दीपक गवारे (वय 40), दीपक निवृत्ती गवारे (वय 45 दोघेही रा.डीएनजी हाऊस,जंगली महाराज रस्ता), दीपाली विरेंद्र पवार  (वय 38 रा. एन.एस जी हाऊस,औंध) आणि भागीरथी इरप्पा उकली (पाटील) (वय 50 रा. एन.एस.जी हाऊस, औंध) अशी जामीन फेटाळलेल्यांची (Pune Court) नावे आहेत. या प्रकरणात आरोपी गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड Ganesh Nanasaheb Gaikwad (वय 36 रा.बी.एस.जी हाऊस औंध) आणि राजू अंकुश (रा.सांगवी पुणे, मूळ श्रीरामपूर जि.अहमदनगर) यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. सहा आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

सरकारी वकील राजेश कावेडिया (Government Advocate Rajesh Kavedia) यांनी जामिनाला विरोध केला. दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून, महिला अत्याचाराशी संबंधित आहे.
नानासाहेब गायकवाड यांनी प्रतिष्ठेसाठी सुनेच्या कुटुंबियांकडे लग्नात मुलीच्या अंगावर शंभर तोळे, नव-यासाठी पन्नास तोळे सोने, लग्नामध्ये पन्नास किलो चांदीचा रूखवत व 1 कोटी रोख रक्कम अशी हुंड्याची मागणी केली.

 

तसेच मुलीला तिच्या गावापासून पुणे येथे हेलिकॉप्टरने घेऊन यावे. सुनेच्या वडिलांनी गायकवाडांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या.
रोख रक्कमेपैकी पन्नास लाख रूपये देणे बाकी आहेत. त्यासाठी आरोपींनी सुनेचा मानसिक आणि शारिरीक छळ केला.
सुनेचे स्त्रीधन देखील सासू नंदा गायकवाड यांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आहे. ते हस्तगत करायचे आहे.
आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते गुन्हयातील पुराव्यात फेरफार अथवा पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया (Adv. Kavedia) यांनी केला.
मूळ फिर्यादीतर्फे ॲड सुधीर शहा (Adv. Sudhir Shah) आणि ॲड पुष्कर दुर्गे (Adv. Pushkar Durga) यांनी काम पाहिले.
गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दादा गायकवाड (Police Inspector Dada Gaikwad) करीत आहेत.

 

Web Title : Pune Court | In this case, bail of 6 persons including Nanasaheb Gaikwad was rejected; Learn the cause and the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Honda Activa एक वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करा 25 हजारात, पसंत न आल्यास कंपनीत परत करा; जाणून घ्या

Pune News | बलात्कार करणाऱ्या आरोपींना त्वरित फाशी द्या, युवती महिला प्रतिष्ठानाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

Flipkart Big Billion Days Sale | फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलीयन डेज सेल’ मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी; मिळेल 80 % पर्यंत सवलत