Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा प्रकोप सुरूच ! दिवसभरात 54 हजार 022 नवीन रुग्ण, 898 रुग्णांचा मृत्यू

Maharashtra State Coronavirus Update

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचा प्रकोप सुरुच आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आज दिवसभरात राज्यात 54 हजार 022 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 898 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 37 हजार 386 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 42 लाख 65 हजार 326 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.36 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 898 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 74 हजार 413 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 54 हजार 788 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 20 हजार 512 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 89 लाख 30 हजार 580 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 49 लाख 96 हजार 758 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.27 टक्के आहे. सध्या राज्यात 38 लाख 41 हजार 431 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 28 हजार 860 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई – 54162, ठाणे – 45670, पालघर -18475, पुणे – 1,20,512, सातारा – 21591, सांगली-18069, सोलापूर – 21885, नाशिक – 40434, अहमदनगर – 23934, जळगाव – 12678, बीड – 15550, लातूर – 14019, बुलढाणा – 14459, नागपूर – 61680, चंद्रपूर – 27154