Maharashtra Strict Restriction | राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला; ठाकरे सरकारकडून नवे निर्बंध लागू, जाणून घ्या

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Strict Restriction | देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत असतानाच आता दुसर संकट उभ टाकले आहे. आता देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta plus variant) थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण आढळले आहेत.
यात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 21 रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यातल्या काही जिल्ह्यांत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिडळाच्या (State Cabinet) बैठकीत राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू (Restrictions Across The States) करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray government) घेतला आहे.
त्यानुसार आज डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील निर्बंधासंदर्भात नवीन आदेश जारी केले आहेत.
Maharashtra Strict Restriction | maharashtra government issued
new orders with levels of restrictions, strict restriction will be…

काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने अनलॉकचा निर्णय घेतला होता.
मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट( Delta Plus variant) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला आहे.
त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करण हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे.
कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय म्हटले आहे नव्या आदेशात

1) राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. 21 जून रोजी डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची राज्यात नोंद झाली. तसेच राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लागू करण्यात येत आहेत. रत्नागिरी, जळगाव आणि इतर जिल्ह्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वसाधारणपणे कठोर निर्बंधांची आवश्यकता आहे.

2) सध्या राज्यातील परिस्थिती पाहता, व्हायरसमधील बदल अन् नव्या व्हेरिएंटमुळे कठोर निर्बंध आवश्यक आहेत. टास्क फोर्सच्या निष्कर्षानंतर पूर्वीच्या आदेशामध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

3) आरोग्य विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, इतर चाचण्यांपेक्षा आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करा. गर्दी, समारंभ, कार्यक्रम, लग्न सोहळे येथे जाणे टाळावे. शहरातल्या ज्या क्षेत्रात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे. त्याठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करा.

4) लागू होणाऱ्या निर्बंधामध्ये आता आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांच्या आधारावरच निश्चित केला जाईल.
रॅट किंवा इतर चाचण्या ग्राह्य धरण्यात येणार नाही.
जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे,
तसेच पात्र असलेल्या नागरिकांचे 70 टक्के लसीकरण पूर्ण करणे गरजचे आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट- ट्रॅक- ट्रिट अशी उपचार पद्धती अंमलात आणावी.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Titel : Maharashtra Strict Restriction | maharashtra government issued new orders with levels of restrictions, strict restriction will be…

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील आढावा बैठक अजित पवारांच्या अनुपस्थितीत; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Pune Crime Branch Police | वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, स्वतःच्या सोसायटीच्या पार्किंगमधूनही…

Sanjay Raut । भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांसंबंधी झालेल्या ‘त्या’ ठरावावरुन संजय राऊत भडकले, म्हणाले..