Maharashtra Temperature | संपूर्ण राज्य गारठले, सर्वत्र हुडहुडी ! महाराष्ट्रात थंडीची लाट, 2 दिवस होणार तापमानात आणखी घट; पुण्यातील तापमान उद्या 10 तर उत्तर महाराष्ट्रात 8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Temperature | उत्तरेकडील राज्यात शीत लहर आली असून तेथील थंड वारे हे दक्षिणेकडे येऊ लागल्याने संपूर्ण महाराष्ट्र गारठला (Clod) आहे. येत्या दोन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी राज्यात सर्वात कमी किमान तापमान धुळे येथे ५.५ अंश सेल्सिअस (Dhule) नोंदविले गेले आहे. नागपूर (Nagpur) येथे ७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. ते सरासरीच्या तुलनेत ५.६ अंशाने घटले आहे. (Maharashtra Temperature)

 

उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भात (Vidarbha Temperature) अनेक ठिकाणचे किमान तापमान सिंगल डिजिट झाले असून कोकणासह (Konkan) मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाड्यातील (Marathawada) बहुतांश ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे.

 

राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश या उत्तर भारतातील अनेक राज्यात सध्या थंडीची लाट आली आहे. राजस्थानमधील अनेक ठिकाणचे तापमान शुन्याच्या खाली गेले आहे. जम्मू काश्मीर, लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडील थंड वार्‍यांचा जोर वाढला असून ते आता दक्षिणेकडे येत आहे. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील किमान (Maharashtra Temperature) तापमानात वेगाने घट झाली आहे. पुणे शहरातील तापमान उद्या १० अंश सेल्सिअसच्या (Pune Temperature) खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात ते ८ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

 

राज्यातील प्रमुख शहरातील सोमवारी सकाळचे किमान तापमान (अंश सेल्सिअस) –

पुणे ११.२, पाषाण १०.९, नागपूर ७.८, अकोला ११.३, अमरावती ८, बुलढाणा १०.५, ब्रम्हपूरी १०, चंद्रपूर ११.४, गोंदिया ८.२, वर्धा ९, गडचिरोली ११.६, अहमदनगर १०.१, कोल्हापूर १५.७, नाशिक ११.४, सांगली १३.८, महाबळेश्वर १२.३, मालेगाव १५, सातारा १२, मुंबई २१.४, हर्णे २०.५, डहाणु १८.६, रत्नागिरी १७.६, शिरुरमध्ये ९.१ अंश सेल्सिअस

 

Pune (पुणे) -

जिल्ह्यातील शिरुर (Shirur) येथे सर्वात कमी किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस सोमवारी सकाळी नोंदविले गेले आहे.
पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान पुढील प्रमाणे वडगाव शेरी १७.५, मगरपट्टा १७.१, चिंचवड १६, जुन्नर १५.९,
लवळे १५.७, गिरीवन १५.१, खेड १४.९, बल्लारवाडी १४.१, इंदापूर १२.५, दौंड १२.४, तळेगाव १२.४, राजगुरुनगर १२.१,
माळीण १०.९, एनडीए १०.३, तळेगाव ढमढेरे १३.१

 

Web Title :- Maharashtra Temperature | Cold wave in Maharashtra, 2 days of further drop in temperature; The temperature in Pune will be 10 degrees Celsius tomorrow and 8 degrees Celsius in North Maharashtra Likely to fall

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा