Maharashtra Vidhan Parishad Election | मतदानादिवशीच एकनाथ खडसेंनी टाकला शाब्दिक बॉम्ब; म्हणाले – ‘भाजपचे अनेक आमदार संपर्कात, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Vidhan Parishad Election | राज्यसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. 10 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. 10 व्या जागेसाठी अतिरिक्त उमेदवार असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असे चित्र दिसत आहे. त्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

मतदानासाठी विधानभवनाकडे जात असताना खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “भाजपचे (BJP) अनेक आमदार माझ्या संपर्कात असले तरी पक्षाला सोडून ते मला मतदान करतील अशी परिस्थिती नाही.” दरम्यान त्यांना या निवडणुकीत भाजप आमदार तुम्हाला मतदान करणार असल्याचे चर्चा सुरू असे विचारले असता खडसे म्हणाले की, ‘भाजपचे आमदार माझ्या संपर्कात आहे हे मला मान्य आहे पण ते पक्षाला सोडून मला मतदान करणार नाहीत.” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Vidhan Parishad Election)

 

महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत फटका बसला होता. मात्र यावेळी तसं काही होणार नाही.
प्रत्येक आमदार त्यांच्या पक्षाच्या आदेशानुसारच मतदान करेल. भाजपच्या अनेक आमदारांशी माझे चांगले सबंध आहे.
ते संपर्कात आहेत हे जरी सत्य असले तरी पक्षाला सोडून ते मतदान करतील अशी परिस्थिती नाही.
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला.

 

Web Title :-  Maharashtra Vidhan Parishad Election | vidhan parishad election maharashtra 2022 eknath khadse says many bjp mlas are in touch with me big statement on polling day

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा