विकासाचा अजेंडा हेच भाजपाचे ‘बलस्थान’, चंद्रकांत पाटलांच्या विजयाचा दानवेंना विश्वास

बाणेर परिसरातील प्रचार सभेला प्रचंड गर्दी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नकारात्मक राजकारणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक घडून गेले असताना भारतीय जनता पार्टीने गल्ली ते दिल्ली सर्वच स्तरांवर विकासाचा अजेंडा यशस्वीपणे राबवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर जनतेने भरघोस मतांची मोहोर उमटवली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे यामध्ये शंकाच नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विश्वास व्यक्त केला.
Chandrakant Patil
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ बाणेर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण परिसरातील नागरिक यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक पदाधिकारी हे देखील यावेळी उपस्थित होते.
BJP
भाजपाचा विकासाभिमुख धोरणांमुळेच सर्व स्तरांवरील निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाले आहे असे सांगून दानवे म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक केवळ नकारात्मक मानसिकतेमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे विकास प्रकल्पांवर फोडण्याचा अजेंडा नाही. ते फक्त मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यावर टीका करीत कांगावखोर भाषणे करीत आहेत. त्यामुळेच जनतादेखील विकासाभिमुख भाजपा महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.
Chandrakant Patil
वाढत्या संख्येने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते आहे. येत्या पाच वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यावर आमचा भर असेल असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी