आम्हाला ‘ED’ची भीती दाखवू नका, त्या ईडीलाच ‘AD’ बनवून टाकू : शरद पवार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – देशातले मोदी सरकार सध्या सरकारी यंत्रणा गुन्हेगारांच्या विरोधात वापरण्याऐवजी राजकीय विरोधकांवर वापरत आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम तुरुंगात आहेत तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे, असे सांगत मला ईडीची भिती मात्र दाखवू नका. मी ईडीलाच येडी करून टाकीन अशा शब्दात शरद पवारांनी टोलेबाजी करत भाजप सरकारवर टीका केली.

ज्यांच्या हातात आता सत्ता आलीय त्यामुळे हे इतिहास बदलण्याची भाषा करु लागल्याचे पवार यांनी सांगितले. यापूर्वी छत्रपतींच्या जाज्वल्य पराक्रमाचा इतिहास असलेल्या गडकिल्ल्यांवर आता हे दारूचे अड्डे आणि छमछम सुरु करायला लागले आहे. तुम्हाला हेच करायचे असेल तर मोडलिंबला जा, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या पैलवानाच्या भाषणावर भाष्य करताना तुम्ही दुसऱ्याला उभे करून कुस्तीची भाषा करताय मात्र आमचे पैलवान तुम्हाला कसे चितपट करतात हे 24 तारखेला दिसेल असे ते म्हणाले.

गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच नव्याने इतिहास लिहण्याचे वक्तव्य केल्याचे सांगत चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती समोर येऊ लागली आहे हे गंभीर असून शिवाजी महाराजांसारखा युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना तो काढण्याचे पाप हे सरकार करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी