Maharashtra Water Supply Minister Gulabrao Patil | जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : Maharashtra Water Supply Minister Gulabrao Patil | बीड जिल्ह्यात (Beed District) अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य नमिता मुंदडा (MLA Namita Mundada) यांनी बीड जिल्हा परिषदमार्फत (Beed ZP) राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या (Jal Jeevan Mission) कामांमधील अनियमिततेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या
कामांमध्ये झालेल्या तक्रारीबाबत बीड जिल्हाधिकारी (Beed Collector) यांनी यापूर्वीच जिल्ह्याच्या
अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे.
तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद (Aurangabad Divisional Commissioner) यांच्या आदेशानुसार उपायुक्त विकास यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती गठित करून विभागीय आयुक्तालयामार्फत चौकशी करण्यात आलेली आहे.
यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar), लक्ष्मण पवार
(MLA Laxman Pawar), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सहभाग घेतला.

Web Title :  Maharashtra Water Supply Minister Gulabrao Patil | High Level Inquiry into Irregularities in Jaljeevan Mission Works – Water Supply Minister Gulabrao Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई’, यासारखी वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? – अजित पवार