
Tukaram Supe Suspended | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर ठाकरे सरकारकडून मोठी कारवाई
शालेय शिक्षण विभागाने तुकाराम सुपे (Tukaram Supe Suspended) यांच्या निलंबनाचा काढलेला हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (Commissioner of Maharashtra State Council of Examination Tukaram Supe) यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी (Private job) स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.
सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून 48 तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये (police custody) आहेत.
Web Title :- Tukaram Supe Suspended | Commissioner of Maharashtra State Council of Examination Tukaram Supe Suspended: Thackeray government
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrakant Patil | ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी यादी पूर्ण’ – चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)