Mahatma Basaveshwar Economic Development Corporation | लिंगायत समाजाला आर्थिक बळ, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून उपकंपनीची स्थापना; चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करून दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mahatma Basaveshwar Economic Development Corporation | राज्यातील लिंगायत समाजातील (Lingayat Community) तरुण, सुशिक्षित बेरोजगारांना आणि नवउद्योजकांना स्वयं उद्योगासाठी आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने (Government of Maharashtra) राज्यात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणून जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची (उपकंपनी) स्थापना (Mahatma Basaveshwar Economic Development Corporation) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

उपकंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (Maharashtra State Other Backward Classes Finance and Development Corporation) मुख्यालयाच्या ठिकाणी असणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालये सुरु करण्यात येणार आहे. महामंडळाचे संचालक मंडळावर अध्यक्ष व उपाध्यक्षांसह तीन अशासकीय सदस्य राहणार आहे.

उपकंपनीच्या कामकाजाकरिता मुख्यालयासाठी एकूण 15 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य वित्तीय अधिकारी, अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहाय्यक महाव्यवस्थापक, लेखापाल, लिपिक, वाहन चालक आणि शिपाई या पदांचा समावेश आहे. (Mahatma Basaveshwar Economic Development Corporation)

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची (उपकंपनी) स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी शासनाचे
आभार मानले आहेत. बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले, राज्यातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या
सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडाळाअंतर्गत जगद्ज्योती
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
या महामंडळ उपकंपनीच्या निर्मितीने लिंगायत समाजाची महत्वाची मागणी पूर्ण झाली आहे.
तर या उपकंपनीच्या क्रियान्वयाने वीरशैव-लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.
या निर्णयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आभार, असे बावनकुळे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pune Municipal Corporation (PMC) | फुरसुंगी, उरूळी देवाची गावं वगळण्यासंदर्भात आज निर्णय, शिंदे सरकारवर निर्णय मागे घेण्याची नामुष्की?