Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mahavikas Aghadi | ठिणगी लावली तर आग भडकणारच. घरी बसलेल्या नेत्याला बोलण्याची संधी मिळावी, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आदेश शिवसैनिक (Shivsena) पाळतात. पंरतु, आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक अशीच सुरु राहिली तर पालकमंत्री घेतील तो निर्णय मान्य आहे. पण वैयक्तिकरित्या अशी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नको अशी उद्विग्नता ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महापौर नरेश मस्के (Mayor Naresh Mhaske) यांनी रविवारी व्यक्त केली.

 

राष्ट्रवादी (NCP) शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे (Former MP Anand Paranjape) यांनी महापौरांवर केलेल्या टीकेनंतर नरेश म्हस्के यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे (Corporator Ram Repale), विकास रेपाळे (Vikas Repale) आणि योगेंद्र जानकर (Yogendra Jankar) यांनीही पत्रकार परिषद घेऊन परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी असल्यामुळे कोणतेही राजकीय भाषण किंवा टीका टीप्पणी नको, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. त्यांचे आदेश शिवसैनिक पाळतात. मात्र, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मात्र टीकाटीप्पणी केली. तो विषय संपला. दिशा बदलूनही आपली हालत काय झाली? हे ज्यांना समजले नाही, त्यांनी महापौरांना कळले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. कलियुगातील कलींना पुरुन उरण्यासाठी या नारदाची गरज असल्याचेही महापौर म्हणाले. (Mahavikas Aghadi)

खरे नारदमुनी आनंद परांजपे
शिवसेनेत नसतो तर महापौर झालो नसतो. त्यामुळे पक्षासाठी काम करणे हे आपले कर्तव्य आहे.
स्मार्ट सिटीमध्ये (Smart City) आपल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेतेही (Opposition Leader) संचालक आहेत.
ही कंपनी कायद्याप्रमाणे चालते. याच कामकाजाची माहिती करुन घ्यावी. मगच कमिशनचा आरोप करावा, असे महापौर म्हणाले.
तर शिवसैनिकांनी चपला झिजवल्यामुळेच दिवंगत प्रकाश परांजपे (Prakash Paranjape) यांच्यानंतर आनंद हे खासदार झाले होते,
अशी आठवण जानकर यांनी करुन दिली. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) खऱ्या अर्थाने नारदमुनी हे आनंद परांजपे असल्याचे विकास रेपाळे म्हणाले.

 

 

Web Title :- Mahavikas Aghadi | if allegations continues then didnt want mahavikas aghadi shivsena stands against ncp thane

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Crime News | ‘न्यूड डान्स’, मित्रांकडून ‘गँगरेप’, ‘अनैसर्गिक संभोग’ अन् ‘प्रायव्हेट पार्ट’वर दिले सिगरेटचे चटके… बिल्डरनं पत्नीला दिल्या ‘नरकयातना’