Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 41 हजार 327 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळले आहेत. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 8 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णांची नोंद झाली असून ते पुणे जिल्ह्यातील आहेत.

 

राज्यात आज 40 हजार 386 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 68 लाख 900 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.3 टक्के झाले आहे. राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.96 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 19 लाख 74 हजार 335 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 72 लाख 11 हजार 810 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.02 टक्के आहे. सध्या 2 लाख 65 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 21 लाख 98 हजार 414 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2921 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 41,327 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | ‘न्यूड डान्स’, मित्रांकडून ‘गँगरेप’, ‘अनैसर्गिक संभोग’ अन् ‘प्रायव्हेट पार्ट’वर दिले सिगरेटचे चटके… बिल्डरनं पत्नीला दिल्या ‘नरकयातना’

 

PMPML | पीएमपीएमएलचा मोठा निर्णय ! बसमधून प्रवास करण्यापूर्वी दाखवावे लागेल संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र; अन्यथा…

 

Corona in Mumbai | मुंबईकरांना मोठा दिलासा ! नव्या बाधितांच्या तुलनेत ‘कोरोना’मुक्त होणार्‍यांची संख्या तिप्पट