विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपालांना ‘या’ 12 नावांचा प्रस्ताव, त्यामध्ये 2 नावे विशेष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ नावांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सादर केली. या यादीत दोन विशेष नावे आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज सायंकाळी ६ वाजता अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली.

त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवलेले यशपाल भिंगे यांचे नाव राष्ट्रवादीकडून देण्यात आले. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीत यशपाल भिंगे यांच्यामुळे पराभव पत्करावा लागलेला. तर वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर विधानसभा निवडणूक लढलेले अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसने संधी दिली आहे.

राज्यपालांना देण्यात आलेली १२ नावे

शिवसेना

१. उर्मिला मातोंडकर
२. नितीन बानगुडे पाटील
३. विजय करंजकर
४. चंद्रकांत रघुवंशी

राष्ट्रवादी काँग्रेस

१. एकनाथ खडसे
२. राजू शेट्टी
३. यशपाल भिंगे
४. आनंद शिंदे

काँग्रेस

१. रजनी पाटील
२. सचिन सावंत
३. मुझफ्फर हुसेन
४. अनिरुद्ध वनकर