महेश मांजरेकरांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला सुरुवात ! ‘हा’ प्रसिद्ध Studio पहिल्यांदाच करणार मराठी सिनेमाची निर्मिती

पोलिसनामा ऑनलाइन – फेमस अ‍ॅक्टर डायरेक्टर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) लवकरच एक नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी सिनेमाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. खास बात अशी की, या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी एन एच स्टुडिओजनं (NH Studioz) स्विकारली आहे. आजवर या स्टुडिओनं पिंक, शिवाय, बेगम जान, ओमर्ता अशा अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. आता हा स्टुडिओ एका मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे.

मुंबईत नुकतीच या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. 28 ऑक्टोबर रोजी सिनेमाचा पहिला सीन शुट करण्यात आला आहे. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “गेली कित्येक वर्षे मी सिनेमाच्या कथेचा विचार करत होतो. जणू माझ्या डोक्यात ही कथा अनेक वर्षे बंदिस्त होती. मी ही कथा विजयला ऐकवला त्याला खूप आवडली. त्यानं ही कथा एन एच स्टुडिओजचे निर्माते नरेंद्रजी यांना ऐकवली. त्यांनीही सिनेमाच्या निर्मितीसाठी लगेच होकार कळवला. आता तर सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे.”

पुढं बोलताना ते म्हणाले, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता तो प्रत्यक्षात साकारत आहे याचा मला आनंद आहे. मी माझे निर्माते आणि सहनिर्मात यांचे मनापासून आभार मानतो.”