‘जोरा द सेकेंड चॅप्टर’ चित्रपटातून कमबॅक करणार माही गिल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाबी आणि हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री माही गिल लवकरच महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ‘ज़ोरा द सेकेंड चॅप्टर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

अलीकडेच एका मुलाखतीमध्ये माहीने सांगितले की, ‘बर्‍याच दिवसानंतर तिला दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.’ तिचे म्हणणे आहे की, ‘पंजाबी अभिनेत्रींना शानदार भूमिका साकारण्याची संधी मिळत नाही, पण अमरदीप सिंग गिल यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात तिला समान हक्क मिळाला आहेत.’

माहीच्या म्हणण्यानुसार, ‘सध्या सिनेसृष्टीची मागणी आहे की महिला कलाकारांचे प्रदर्शन केले जाणे आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात ‘जोरा द सेकंड चॅप्टर’ पासून सुरू झाली आहे. दिग्दर्शक मनदीपसिंग सिद्धू, हरप्रीतसिंग देवगण, जेरी बराड, विमल चोपडा आणि अमरिंदरसिंग राजू यांचा हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल.’ अभिनेत्रीने सांगितले की, “अमरदीपसारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.’

एवढेच नव्हे तर माही म्हणाली की, ‘अभिनेता दीपसिंग सिद्धूसोबत स्क्रीन शेअर केल्याने ती खूप खूश आहे. तिच्या मते दीप सिंग यांच्यासारख्या कलाकारांकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकते की ते पंजाबचे प्रश्न पडद्यावर प्रकाश टाकण्यात हातभार लावू शकतात. अभिनेत्री पुढे म्हणाली की, हा चित्रपट लोकांची मने जिंकण्यात यशस्वी होईल. हा चित्रपट लवकरच 6 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा