‘राखी सावंतनंच कोरोना व्हायरस चीनमधून भारतात आणला’, ‘या’ अदाकारानं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत हिनं काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिनं सांगितलं होतं की, फक्त तीच आहे जी कोरोना व्हायरसला नष्ट करू शकते. राखीचा हा व्हिडीओ प्रचंड झाला होता. यावर आता अभिनेत्री माहिका शर्मानं कमेंट केली आहे. राखीच्या व्हिडीओवर कमेंट करत माहिका म्हणते, “राखीच चीनमधून व्हायरस घेऊन आली आहे. आता फक्त तीच आपल्याला या व्हायरसपासून वाचवू शकते.”

माहिका आपल्या कमेंटमध्ये म्हणते, “आपण या व्हायरससोबत झुंज देत आहोत याचं कारण राखीच आहे. कारण तीच हा व्हायरस चीनमधून भारतात घेऊन आली आहे. राखी सावंत तिचे फनी व्हिडीओज बनवून आपल्याला या व्हायरसपासून वाचवू शकते. आपण आजकाल खूप बोरदेखील होत आहोत.” माहिका शर्माच्या या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.

अनेक ट्रोलर्स असे आहेत ज्यांनी राखीलाच व्हायरस म्हटलं आहे. याआधीही राखीनं एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती चीनी लोकांना दोष देताना दिसली होती. राखी म्हणाली होती की, “जनावरांना खाल्ल्यानं त्यांना एक धडा मिळाला आहे. त्यांनी हे सगळं नाही खाल्लं पाहिजे. प्रभू या पापी चीनी लोकांना माफ कर.” असंही राखीनं म्हटलं होतं.

https://www.instagram.com/p/B2A1UFWpQ_g/

https://www.instagram.com/p/B1xXt-IpfIm/

https://www.instagram.com/p/BtVT-ILBPPN/

https://www.instagram.com/p/BsbB5Q3gR7k/

https://www.instagram.com/p/Brz0ywGgNBO/

https://www.instagram.com/p/Bq_3i4KgH3N/

https://www.instagram.com/p/Bq9QP7rAjo1/

https://www.instagram.com/p/Bq7vy_Ag1OG/