वाढदिवसाच्या पार्टीला ‘ट्रिपल’ सीट जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू, 2 तरुणी जखमी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – वेगाने वाहन चालवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. दुचाकीवर हा तरुण ट्रिपल सीट चालला होता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या तरुणाचा जीव गेला. नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुणी पुलावरुन थेट खाली कोसळली. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्या बहिणीला किरकोळ दुखापत झाली आहे. तरुणीवर मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ठाण्याच्या माजिवडा येथील उड्डाणापुलावर शनिवारी ही घटना घडली.

मृत झालेल्या तरुणानाचे नाव चंदनसिंग अनिलसिंग वय 19 राहणार लोकमान्य नगर पाडा असे आहे. पूनम जैस्वार वय 22 आणि तिची बहिण नीलम वय 18 राहणार कॅसलमिल या जखमी झाल्या आहेत. या दोघी बहिणी चंदनसिंग याच्या दुचाकीवरुन वाढदिवसांच्या पार्टीला जात होत्या. त्यांच्या काही मैत्रिणी मागून रिक्षाने येत होत्या.

माजिवडा येथील उड्डाणपुलावरील वळणावर चंदनसिंग याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वाहन पुलाच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. चंदनसिंग आणि नीलम पुलावरुन थेट खालीच कोसळे. यात चंदनसिंग हा गंभीर जखमी झाला. तर नीलम बेशुद्ध झाली. वाहतूक पोलिसांनी या घटनेनंतर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतू अपघाताच चंदनसिंगचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. नीलमला उपचारासाठी मुंबईत जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. पूनमने दिलेल्या तक्रारीनंतर चंदनसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Visit : Policenama.com