होंडा सिटीच्या धडकेत आजी, नातवाचा मुत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

भरधाव जाणाऱ्या होंडा सिटी कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने नगर रोडवरील चार वाहनांना धडक दिली. त्यात रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांना जखमी केले. या अपघातात आजी व नातवाचा मृत्यु झाला. शांताबाई साहेबराव सोनवणे (वय ६१) आणि नयन रमेश मोकळे (वय ११, रा. सातववस्ती, खराडी) अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात महेंद्र लोखंडे हेही जखमी झाले आहेत. हा अपघात नगर रोडवरील रेडिसन हॉटेलसमोर बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडला. अपघातानंतर कारचालक पळून गेला असून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2990f3f4-bc93-11e8-b74e-f94254715969′]

नगर रोडवर सातव्या दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या. या वेळी होंडा सिटी कार हॉटेल रेडिसनकडून खराडीकडे जात होती. वेगाने आलेल्या होंडा कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने रस्त्यावरील तीन ते चार वाहनांना धडक दिली. त्यावेळी शांताबाई सोनवणे या आपला नातू नयन याच्यासह रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. कारने त्यांना तसेच लोखंडे यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना शांताबाई व नयन यांचा मध्यरात्री मृत्यु झाला.

कॅम्पमधील पंचताराकिंत हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अपघातानंतर लोकांची मोठी गर्दी जमली होती. हे पाहून कारचालक कार तेथेच सोडून पळून गेला आहे. अपघाताचे वृत्त समजताच सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना शांत केले. चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.