मलायका दिसली ‘अशा’ अवतारात ; चाहते म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा जिम लुक असो किंवा रेड कार्पेट लुक आपल्या ड्रेसिंग सेन्सने ती नेहमीच चाहत्यांचं मन जिंकत असते. मलायका बिकीनीपासून ते बोल्ड ड्रेसपर्यंत प्रत्येक आऊटफिट चांगल्या पद्धतीने कॅरी करत असते.

सध्या मलायका बांद्र्यातील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाली. यावेळी मलायका एकदमच हटके अंदाजात दिसून आली. नेहमीच हॉट आणि बोल्ड ड्रेसमध्ये दिसणारी मलायका यावेळी मात्र बिना मेकअप आणि पिवळ्या रंगाच्या फुल स्लीव्स सूट- सलवारमध्ये दिसून आली. ती खूपच सोबर आणि सुंदर दिसत होती.

मलायकाने आपल्या गळ्यात पांढऱ्या रंगाची ओढणीही घातली होती. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी तिने बनही केला होता आणि गॉगलही घातला होता. यावेळी मलायकाच्या सोबत अर्जुन कपूर दिसून आला नाही. सोशलवर मलायकाचा हा फोटो सध्या खूपच व्हायरल होताना दिसत आहे. लोक तिच्या लुकबद्दल चर्चा करताना दिसत आहे.

एका युजरने मलायकाच्या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे की, “तुम्हीतर ओळखूही येत नाहीत मॅम”. आणखी एक युजर म्हणतो की, ही तर कमालच झाली. आणखी एक युजर म्हणतो की, तशी तर तू छान दिसतेस.

काही दिवसांपूर्वी मलायकाचा एक अंडरवाटर फोटो सोशलवर व्हायरल झाला होता. यात मलायकाने बिकीनी घालून ती स्विमिंग करताना दिसत होती. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या होत्या. या पोस्टवर फराह खाननेही कमेंट करत म्हटलं होतं की, हा फोटो कोणी काढला आहे?