अश्लील चित्रीकरण करणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – बाथरुममधील महिलेचे अश्लिल चित्रीकरण करणाऱ्या एका ३४ वर्षीय आयटी इंजिनीअरला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आयटी इंजिनीअरने बाथरुमच्या खिडकीतून मोबाईलमध्ये चोरुन अश्लिल चित्रीकरण केले होते. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली.

अटक करण्यात आलेला आयटी इंजिनीअर हा ढोकाळी येथील एका सोसायटीत राहतो. त्याचे लग्न झाले असून पीडित महिला या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहते. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित महिला बाथरुमध्ये गेली असता आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

त्यावेळी बाथरूमच्या खिडकीतून कोणीतरी मोबाइलमध्ये चित्रिकरण करत असल्याचे दिसले. तिने ही बाब पतीला सांगितली. नंतर सोसायटीत आरडाओरडा झाल्यानंतर या तरुणाला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती कापुरबावडी पोलिसांनी दिली. आरोपीने यापूर्वी आणखी कोणाचे मोबाइलमध्ये चित्रिकरण केले आहे का, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us