‘रात्री-अपरात्री’ दरवाजाची बेल वाजवून तो जात होता पळून, पुढं झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कांजूरमार्ग येथील एका को-ऑप सोसायटीत राहणाऱ्या राकेश मेहता यांच्या घराची बेल वाजवून पळून जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. राकेश मेहता हे सराफ आहेत. त्यांचे याच परिसरात सोने चांदी दागिन्यांचे दुकान आहे. रात्री उशिरा त्यांच्या घराची बेल वाजवून एक व्यक्ती पळून गेल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे.

कांजूरमार्ग पोलिसांनीअटक केलेल्या व्यक्तीचे नाव प्रेम लालसिंग नेपाळी (३७) असे आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये देखिल त्याच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात देखील त्याने अगदी अशाच प्रकारे मेहता यांच्या घराची रात्रीच्या वेळी बेल वाजवून पळ काढला होता. त्यानंतर मेहता यांनी आपल्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही सुद्धा लावून घेतला होता. आता यावेळी सिसिटीव्ही कॅमेरात त्याचे चित्रीकरण झाले आहे.

नेपाळी याने असे का केले याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत मात्र हे कृत्य त्याने नशेत केले असावे असे पोलिसांचे म्हणणे आहे. २ वेळा एकाच व्यक्तीकडून असा प्रकार घडल्यानंतर मेहता यांनी पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आहे. पण पोलिसांनी अटक केलेल्या नेपाळी याने हे कृत्य का केले याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने कोणतेही उत्तर दयायला मात्र नकार दिला आहे. त्यामुळे नेपाळी याने नक्की असे का केले याचा मात्र उलघडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/