अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या वडिलांवर हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

रस्त्यावरुन जाणाऱ्या अल्पवयीन तसेच महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आपले शिक्षण बंद होईल, या भितीने अनेक कुटुंबातील मुली हे प्रकार आपल्या घरी सांगत नाही. ज्या धाडस करुन घरी सांगतात. त्यांच्यावरही आता मारहाण होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना जाब विचारणाऱ्या वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार सायनमध्ये घडला. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपू मंडल याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ffacabe7-caa9-11e8-b14b-3552a527ac58′]

सायन परिसरात हे कुटुंब रहाते. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून येता-जाताना मंडल त्यांच्या १० वर्षाच्या मुलीला पाहून अश्लील शेरेबाजी करायचा. तिने त्याला यापूर्वीही वारंवार बजावले होते. तरीदेखील तो तिचा पाठलाग करत छेड काढत असे. शनिवारी त्याने भररस्त्यात तिची छेड काढली. मंडलचा त्रास वाढत असल्याने तिने याबाबत वडिलांना सांगितले.

पुणे/पिंपरी/भोसरी : डॉक्टर युवतीचा (Leady Doctor) गळ्यात मांजा अडकून गळा चिरल्याने दुर्दैवी मृत्यू (Death)

मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर वडिलांनी याबाबत मंडलला जाब विचारला. याच रागात त्याने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यातूनच मंडलने मुलीच्या वडिलांना मारहाण सुरू केली व त्यांच्या पायावर धारदार शस्त्राने वार केले. तेथे स्थानिक जमताहेत हे पाहून मंडलने पळ काढला.

[amazon_link asins=’B00CHXQD7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f78b145-caaa-11e8-af3d-339a2230fc86′]

तेथे जमलेल्या लोकांनी मुलीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले व रात्री सायन पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा मंडलविरुद्ध विनयभंग, पॉक्सो, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.