महिलेवर चाकू हल्ला करत स्वतःही इमारतीवरून उडी मारत केली आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –    ठाण्यातील बाळकुम नाका परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाने महिलेवर चाकू हल्ला करत स्वतःहि हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. हि घटना बुधवारी घडली असून हि ३३ वर्षीय महिला ठाण्याच्या सावरकर नगरमध्ये राहते. तर शोभराज राघनी (वय ५४ रा. कल्याण) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, शोभराज आणि या महिलेची पाच वर्षपूर्वी ओळख झाली होती. बुधवारी बाळकुम येथील एका हॉटेलमध्ये या दोघांनी रुम घेतली. दरम्यान काही कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातूनच शोभराजनं महिलेवर चाकूनं हल्ला केला. यानंतर त्यानं स्वतःदेखील रुमच्या खिडकीतून उडी मारली. शोभराजचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. कापूरबावडी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.