सापडलेला पहिला ‘दगड’ विकून ‘त्यानं’ कमावले 23.5 कोटी, दुसरा सापडल्यानंतर उघडलं ‘नशीब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यक्तीला खोदकाम करताना एक असा अजब दगड (टांझनाइट स्टोन) सापडला, जो विकून त्याने १४.७ कोटी रुपये कमावले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तीला काही काळापूर्वी असाच आणखी एक दगड सापडला होता आणि पहिला दगड विकून त्याला २३.५ कोटी रुपये मिळाले होते.

एका वृत्तसंस्थेनुसार, दोन वेळा कोट्यवधी रुपयांचा दगड मिळणाऱ्या या व्यक्तीचे नाव सॅनिनिऊ लॅजेर आहे. तो टांझानियाचा रहिवासी आहे आणि तेथीलच खाणीत काम करत असताना त्यांना हे दगड सापडले आहेत. टांझानिया हा पूर्व आफ्रिकन देश आहे, जो केनिया आणि झिम्बाब्वेजवळ आहे. सॅनिनिऊ हे ५२ वर्षांचे आहेत आणि ते ३० मुलांचे वडील आहेत.
खुदाई करते-करते युवक को मिली ऐसी बेशकीमती चीज, 14 करोड़ रुपये में बिकी

सॅनिनिऊला सापडलेल्या नवीन Tanzanite दगडाचे वजन ६.३ किलो होते. सोमवारी एका खास सोहळ्यात त्यांनी हा दगड १४.७ कोटी रुपयांना विकला. हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित होते.

सॅनिनिऊला चार बायका आहेत आणि एकूण ३० मुले आहेत. दगड विकून मोठ्या प्रमाणात पैसे कमावल्यानंतर ते म्हणाले की, त्या पैशातून एक शाळा व शॉपिंग मॉल तयार करणार आहे. मात्र एवढे पैसे कमावल्यानंतरही ते त्यांची राहण्याची पद्धत बदलणार नाहीत आणि पूर्वीप्रमाणेच २००० गायींची देखरेख करतील, असेही ते म्हणाले.

सॅनिनिऊला मौल्यवान दगड मिळाल्याची खात्री टांझानियाच्या खाण मंत्रालयाने केली आहे. Tanzanite दगडाचा अपवाद म्हणून याला Gemstone म्हणतात.