धक्कादायक ! मंदिरातील ध्वजाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – एका मजूर युवकाने मंदिरातील ध्वजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील वाकडी येथे शुक्रवारी सकाळी उघडकिस आला.

आनंदा बाजीराव गायकवाड (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

आनंदा गायकवाड हा मोलमजूरीचे काम करतो. गुरुवारी तो कामावरून घरी न परतता थेट मंदिरात गेला. मंदिरात गेल्यावर तो तेथेच झोपला. शुक्रवारी सकाळी लोकांनी पाहिले तेव्हा त्याने मंदिरातील झेंड्याच्याच साह्याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी लोकांनी त्याला खाली उतरवले. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा उपचारापुर्वीच त्याला मृत घोषीत करण्यात आले. दरम्यान त्याचा मागे पत्नी, दोन मुले, व भाऊ असा परिवार आहे. तर त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Loading...
You might also like