आश्चर्य ! मिशी कापली म्हणून न्हाव्याविरोधात पोलिसात तक्रार

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – नागपुरात एक अनोखा किस्सा समोर आला आहे. न्हाव्याने मिशी कापल्यामुळे एका तरुणाने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन या न्हाव्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिशी ही पुरुषाची शान समजली जाते. त्यामुळे अनेक पुरुष दाढी नसली तरी चालेल मात्र मिशी हवीच, असा विचार करतात, मात्र या न्हाव्याने मिशी कापल्यामुळे संताप झालेल्या युवकाने थेट पोलीस स्टेशनच गाठले.

किरण ठाकूर नावाच्या या तरुणाने या न्हाव्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. १६ जुलै रोजी ‘फ्रेंड्स जेन्ट्स पार्लर’ या दुकानामध्ये हा तरुण केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी गेला होता. मात्र यावेळी न्हाव्याने मिशी कापली म्हणून थेट त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. मिशी कापल्यानंतर न्हावी आणि किरण ठाकूर या दोघांमध्ये सुरुवातीला वाद झाला, मात्र या वादामुळे चिडलेल्या ठाकूर यांनी अखेर पोलिसांत धाव घेत न्हावी आणि या दुकानाचा मालक असे दोघांविरोधात तक्रार नोंदवली.

दरम्यान, या प्रकरणात कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद करायचा असा प्रश्न पोलिसांना पडला आहे, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like