Coronavirus : ‘कोरोना’ची चाचणी करण्यास नकार, भावंडांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना चाचणीला नकार दिल्यामुळे भावडांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर भागात घडली आहे. मनजित सिंह असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो काही दिवसांपूर्वी दिल्लीवरुन बिजनौरमधील मलकपूर गावी आला होता.यापृकरणी पोलिसांनी कपिल सिंह आणि मनोज सिंह या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गावी आल्यानंतर कोरोनाची चाचणी करुन घेण्यास मनजितची भावंड त्याला सांगत होती, त्याने नकार दिल्यामुळे झालेल्या वादात मनजितच्या चुलत भावडांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे तो जखमी झाला. त्याला मीरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मनजितने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर मनजितचे वडील कल्याण सिंह यांनी दोन भावंडासह त्यांची आई पुनिया आणि मनोजची पत्नी डॉली यांच्याविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बिजनौरचे अतिरीक्त पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजित आणि त्याच्यासोबतचे काही कामगार दिल्लीवरुन 19 मे ला बिजनौरला पोहचले. यावेळी त्यांची थर्मल स्क्रिनींगद्वारे चाचणी घेण्यात आली. यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे त्यांची पुढील चाचणी घेण्यात आली नाही. मात्र घरी परतल्यानंतर मनजितचे भाऊ कपिल आणि मनोज त्याला वारंवार, करोनाची चाचणी करुन घे अशी मागणी करत होते. गुरुवारी मनजित आणि त्याच्या भावंडांमध्ये चाचणी करुन घेण्यावरुन पुन्हा एकदा वाद झाला. यामुळे संतापलेल्या कपिल आणि मनोज यांनी काठ्यांनी मनजितला मारहाण करण्यास केली.