Coronavirus : युवकानं लपवलं ‘लक्षण’, प्रेग्नंट पत्नीला देखील करून टाकलं ‘कोरोना’ संक्रमित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्नीच्या डिलिव्हरी दरम्यान एका व्यक्तीने स्वतःमधील कोरोनाची लक्षण असल्याचे लपवले ज्यामुळे त्याची पत्नीही आजारी पडली. माहितीनुसार, हे प्रकरण न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयातील आहे. पत्नी मॅटर्निटी वॉर्डमध्ये भरती होती आणि पती तिला भेटायला म्हणून गेला होता,

ही घटना मागच्या आठवड्यातील असून न्यूयॉर्कच्या स्ट्रॉंग मेमोरियल रुग्णालयातील आहे. डिलिव्हरीनंतर जेव्हा पत्नीची तपासणी केली गेली तेव्हा तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळली होती. आता रुग्णालयात येणाऱ्या व्हिजिटर्सची कठोर तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून व्हिजिटर्सलाही सर्जिकल मास्क घालणे बंधनकारक आहे. रिपोर्टनुसार, पत्नीमध्ये कोरोना संक्रमणाची लक्षणे आढळल्यानंतर पतीने स्वतःची उपस्थिती जाहीर केली.

अमेरिकेत पाहिल्यापासूनच रुग्णालयाने व्हिजिटर्सची संख्या कमी केली आहे आणि काही लोकांना रुग्णालयात रुग्णांच्या जवळही येऊ देत नाही. पण पत्नीला संक्रमित करण्याच्या या प्रकरणानंतर रुग्णालयावर अनेक प्रश्न केले जात आहेत.

रुग्णालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, बाळाच्या जन्मानंतर काही वेळाने आईमध्ये लक्षणं आढळून आली. यादरम्यान पतीने मान्य केले की, त्याच्या शरीरातही काही लक्षणे आहेत. तर रुग्णालयाने गोपनीयतेमुळे जास्त माहिती देण्यास नकार दिला.

अमेरिकेत चार हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एक लाख ८८ हजारपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत संक्रमण झाले आहे.