धक्कादायक… मित्राचा शिरच्छेद करून गावभर हिंडला शीर घेऊन

बंगळुरू : वृत्तसंस्था

कर्नाटकात एक निर्घृण हत्येचा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आधी आपल्या मित्राची हत्या केली आणि नंतर त्याचे मुंडके उडवून गावभर मिरवले. यानंतर मित्राचे मुंडके हातात घेऊन तो थेट पोलीस स्थानकामध्ये हजर झाला. खुनी व्यक्ती मुंडके हातात घेऊन पोलीस स्थानकात आल्याने काही काळ पोलीसही हादरले होते. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या मित्राचे मुंडके हातात घेऊन चालताना दिसत आहे. स्थानिक प्रसारमाधमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे नाव पशुपती असल्याचे उघड झाले आहे. पशुपतीने आधी आपला मित्र गिरीशची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर सकाळी हातात मुंडके घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. त्याचा हा अवतार पाहून पोलिसांनाही धक्का बसला. परंतु त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e06cdd3-c7f2-11e8-afae-cd72fc955821′]

पोलिसांना प्राथमिक तपासामध्ये गिरीश आणि पशुपती चांगले मित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही चिकाबगिलू या गावात राहात होते. गेल्या शनिवारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की पशुपतीने गिरीशची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

[amazon_link asins=’B07FXVDKXZ,B073Y9G4JH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22abafdc-c7f2-11e8-be0c-efab827d7bd1′]

गेल्या काही महिन्यांमध्ये मुंडके वेगळे करून हातात घेऊन मिरवण्याची ही कर्नाटकातील तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना चिकमंगलुरू येथे झाली होती. येथे सतिश नावाचा एक व्यक्ती एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात चाकू घेऊन येथील पोलीस स्थानकात आला होता. सतिशने पत्नीची हत्या करून तिचे मुंडके धडापासून वेगळे केले आणि बॅगेत भरून पोलीस स्थानकात हजर झाला होता. अनैतिक संबंधांच्या संशयावरून सतिशने पत्नीची हत्या केली होती. यानंतर चिक्काबल्लापुरा येथेही अशीच घटना घडली. येथे अजिज नावाच्या व्यक्तीने रोशनी खान नावाच्या तरुणीने मुंडके धडापासून वेगळे केले होते आणि ते मुंडके घेऊन तो थेट श्रीनिवासपुरा पोलीस स्थानकात हजर झाला होता. प्रेमसंबंधातून अजिजने हत्या केली होती.

मित्राच्या खूनाच्या बदल्यासाठी गेम ; पाच जणांना अटक ; हल्लेखोर अल्पवयीन