‘सौंदर्य’ संपून जाईल म्हणून पती मला ‘आई’ बनू देत नाही, महिलेनं पोलिसांकडे केली तक्रार

गाझियाबाद : वृत्त संस्था – एका महिलेने पतीची तक्रार करून आरोप केला आहे की, तो तिला आई होऊ देत नाही. म्हणतो की, तिच्या सौंदर्यावर परिणाम होईल. याशिवाय हुंड्यासाठी मारहाण केल्याचाही आरोपही या महिलेने पतीवर केला आहे. सध्या महिलेने एसएसपी ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता कविनगर पोलीस ठाण्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.

महिलेचा आरोप आहे की, मागील 5 वर्षात ती 4 वेळा गरोदर राहिली, परंतु तिचा गर्भपात करण्यात आला. महिलेचे म्हणणे आहे की, पती म्हणतो की, जर ती एकवेळ आई झाली तर तिचे सर्व सौंदर्य नष्ट होईल, मग तो तिच्यासोबत कसा राहू शकतो.

2015 मध्ये झाले लग्न
पीडित महिलेने सांगितले की, तिचे लग्न 2015 मध्ये झाले होते. तिचा विवाह अंतरजातीय होता. परंतु, त्यास कुटुंबियांची सहमती होती. यादरम्यान पतीने घरजावई होण्याबाबत म्हटले आणि कुटुंब वाचवण्यासाठी माहेरच्यांनी मान्यता दिली. यानंतर ते पतीसोबत कविनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलनीत येऊन राहू लागले. यानंतर पतीने बांधकाम व्यवसायासाठी तिच्या वडीलांकडून पैसे मागितले, ते न मिळाल्याने तिला मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर तिला धमकावण्यासाठी पतीने पिस्तुलसुद्धा घेतले होते.