क्राईम स्टोरीनवीदिल्ली

संतापजनक ! मेट्रोमध्ये मुलीच्या समोरच मुलानं पॅन्ट ‘ओपन’ करून दाखवला ‘प्रायव्हेट पार्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेट्रोमध्ये फिरताना आपल्याला बर्‍याच विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या एका मुलीच्या समोर एका मुलाने पँट उघडली आणि तिच्यासमोर खासगी पार्ट दाखवला.

बुधवारी सायंकाळी सहा वाजता यलो मेट्रो लाईनमध्ये मुलगी दिल्लीहून गुडगावकडे जात होती. तेवढ्यात, समोर उभे असलेल्या एका मुलाने त्यांच्या पॅन्टची झिप उघडली आणि अश्लील कृत्ये करण्यास सुरवात केली. या घटनेने घाबरलेल्या मुलीने त्यावेळी कुणालाही काही सांगितले नाही, परंतु तिने मुलाचा फोटो काढला आणि नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. आधी पोलिसांनी एफआयआर करण्यास नकार दिला असा आरोप मुलीने केला. नंतर, जेव्हा मुलीने महिला हेल्पलाईनवर कॉल केला तेव्हा पोलिस सक्रिय झाले. मुलीच्या तक्रारीवरून लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मेट्रोच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून घटनेच्या वेळेचे छायाचित्र काढण्यात आले. आता सीसीटीव्ही आणि मुलीकडून मिळालेल्या चित्राच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

या घटनेने घाबरलेल्या मुलीने आपली कहाणी सोशल मीडियावरही शेअर केली. त्यांनतर डीएमआरसीने सांगितले की त्यांनी तातडीने मेट्रो किंवा सीआयएसएफ हेल्पलाईनवर कॉल करावा. या प्रकरणात केवळ फोटोमध्ये दिसणारा मुलगा आरोपी आहे. त्या मुलीसमोर अश्लील कृत्य होतं. मुलीने ट्विटमध्ये लिहिले की, मला खूप धक्का बसला आहे. मी काय करावे ते समजू शकले नाही. मलाही राग येत होता. मी मुलाचा फोटो केव्हा घेतला हे आठवत नाही. एक तासानंतर मी सर्व घटना मित्राबरोबर शेअर केली.

मुलीने सांगितले कि, ती संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतत होती. मेट्रोच्या सातव्या कोचच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या 2 सीटर खुर्चीवर मी बसले होते. समोरच्या गेटजवळ एक मुलगा उभा होता. तो सतत माझ्याकडे पहात होता. तेवढ्यात मुलगा वळला आणि त्याने माझ्यासमोर पँटची झिप उघडली. तिने सांगितले कि, तो माझ्यासोबत लैंगिक छळ करीत होता. कोणालाही काही कळू नये म्हणून त्याने आपली बॅग समोर लटकवली होती. काही वेळाने मुलगा दाराकडे वळून उभा राहिला. मग शांतपणे दुसर्‍या कोचकडे गेला.

Back to top button