काय सांगता ! होय, पत्नीनं धोका दिला, पतीनं तिच्या बॉयफ्रेन्डकडून वसुल केला कोट्यावधीचा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्नीच्या बेईमाणपणाला कंटाळून एका व्यक्तीने पत्नीच्या बॉयफ्रेंड विरोधात तक्रार दाखल केली आहे. अमेरिकेच्या नॉर्थ केरोलिनामधील हा प्रकार आहे. केविन हॉवर्ड नामक व्यक्तीने पत्नीच्या बॉयफ्रेंडवर तक्रार दाखल करत सहा कोटींची ही केस जिंकली आहे. केविनला लग्नाच्या बारा वर्षानंतर समजले की आपली पत्नी आपल्याला धोका देत आहे तेव्हा केवीनने एका जुन्या कायद्याचा आधार घेत पत्नीच्या बॉयफ्रेंडवर तक्रार दाखल केली.

‘homewrecker’ कायद्यानुसार एखादी महिला किंवा पुरुष एखाद्यावर मुद्दामून आपल्या विवाहित जीवनात हस्तक्षेप केल्याचा आणि आपल्या पार्टनरला आपल्या पासून वेगळे करण्याचा आरोप करू शकतो. बारा वर्षानंतर पत्नी धोका देत आहे असे समजताच पत्नीला त्रास देण्याऐवजी केवीन न्यायालयात चक्रा मारू लागले. पत्नी खरंच आपल्याला धोका देत आहे का हे माहिती करून घेण्यासाठी केवीनने एक डिटेक्टिव्हची मदत घेतली.

त्यानंतर केविन यांना मोठा झटका लागला कारण त्यांच्या पत्नीचे संबंध हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत होते ज्याला केविन त्यांच्या पत्नीचा चांगला मित्र समजत होते. लग्नावरून लोकांचा विश्वास तसाही उडत चालला आहे म्हणून केविन यांनी लग्नाच्या मर्यादा पाळत केस करण्याचा निर्णय घेतला.

केवीनने आता पत्नीला घटस्पोट दिला आहे मात्र न्यायालयीन दंड न देता आल्यामुळे त्यांच्या पत्नीच्या बॉयफ्रेंडवर कर्ज होणार आहे. 6,56,11,875 रुपयांच्या या केसला जिकणाऱ्या केवीनच्या वकिलांनी सांगितले की, या कायद्याचा हेतू परिवाराला जोडून ठेवणे हा आहे. म्हणजे कोणीही एकमेकांना धोका देताना विचार करेल.