सलमानला जिवे मारण्याची धमकी, आरोपी म्हणाला – ‘कोर्ट नाही तर मी त्याचा जीव घेऊन देणार शिक्षा’

जोधपूर : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे जो आरोपी पोलिसांनी गाडी चोरताना पकडला होता, त्यानेच सलमान खानला ठार मारण्याची धमकी त्यानेच दिली हे तपासात उघड झाले. आरोपीचे नाव जॅकी बिश्नोई असे आहे.

कोर्ट नाही तर मी शिक्षा देणार –

आरोपी जॅकी बिश्नोई याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात त्याने सलमान खानला धमकावले होते की, त्याच्या गुन्ह्यांसाठी कोर्ट काय शिक्षा देईल, मीच त्याचा जीव घेईन… मी त्याला शिक्षा करीन. जॅकीने ही पोस्ट करताच ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. काळवीट शिकार प्रकरणी त्याने ही हे पोस्ट केली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने ही पोस्ट पब्लिसिटी मिळवण्यासाठी टाकली होती.

पोलिसांनी वाहन चेकिंग करताना संशयित म्हणून लक्झरी कारमधून जाणाऱ्या दोन आरोपींना पकडले होते. पोलिसांनी चौकशी केली असता कार चोरीची असल्याची तसेच मादक पदार्थांची तस्करी करण्यासाठी हे दोघे वाहन चोरी करत होते असे आढळून आले. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली तेव्हा असे निदर्शनास आले की सोशल मीडियावर सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देणारा जॅकी हा एक आरोपी होता.

Visit : Policenama.com