गायब पत्नीच्या शोधात पती पोहचला मित्राच्या घरी, बंद फ्लॅटमध्ये ‘ते’ पाहून भांबवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ठाणे जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अंबरनाथ येथील फ्लॅटमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. त्यांचे दोन्ही शरीर सडत होते. फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळलेल्या 36 वर्षीय महिलेचे नाव जयंती शहा असे आहे. ती 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती आणि तिचा नवरा अजित यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याचा रिपोर्ट नोंदविला होता. दुसरा मृतदेह त्यांच्यासोबत काम करणारे 39 वर्षीय संदीप सक्सेना यांचा होता, जे अंबरनाथ पूर्वेतील प्रसादम रेसिडेन्सीमध्ये राहत होते.

अजित यांनी आपली बायको गायब झाली तेव्हा तिला शोधण्याच्या प्रयत्नात आपला खास मित्र आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. दोन दिवसांनंतर जेव्हा ते मित्राच्या फ्लॅटवर गेले तेव्हा दार उघडलेले होते. ते आत गेले तेव्हा त्याची पत्नी आणि मित्राचा मृतदेह दोन्ही कुजलेल्या अवस्थेत पडला होता. ही खळबळजनक घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आहे.

सक्सेनाने त्याचा गळा कापण्यासाठी स्टोन ग्राइंडर कटरचा वापर केला होता. त्यांना पाहून असे वाटत होते की, पहिले संदीपने जयंतीला ठार मारले आणि नंतर स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सक्सेना आणि अजित अंबरनाथमधील एका खासगी कंपनीत काम करतात. सक्सेना अजितच्या घरी नियमितपणे येत असे आणि त्यांची पत्नी जयंतीची आणि त्याची मैत्री झाली होती. पोलिसांना दिलेल्या निवेदनात अजित म्हणाले की, जयंती आणि सक्सेना यांच्यात संबंध होते आणि त्यांनी त्याला विरोध केला होता. 17 नोव्हेंबरपासून जयंती बेपत्ता झाली होती आणि सक्सेना अजितने केलेल्या कॉलला प्रतिसाद देत नव्हता त्यानंतर अजितने सक्सेनाच्या घरी चौकशी केली. दरवाजा ठोठावला असता तो उघडाच असलेला आढळला. जयंती आणि सक्सेना दोघेही फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळले.

You might also like