‘मंगेशकर’ कुटुंबाची देवेंद्र फडणवीसांवर ‘नाराजी’

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विनोद तावडे त्यांना भेटायला आले नाहीत, अशी खंत पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली. ते कर्जत येथील एका कार्यक्रमात बोलत होते.


पंडीत हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, कार्यक्रम हवा असल्यास नेते मंडळी अनेकदा भेटतात, फोन करतात. मात्र, दीदी आजारी होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री तावडे भेटायलाही आले नाहीत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी लतादीदींची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मंगेशकर कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी जवळचे स्नेहसंबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सहवासात मी 22 वर्षे होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे प्रेरणास्थान होते. या स्वातंत्र्यवीरांवर काँग्रेसकडून टीका होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखवली. 30 ते 35 वर्षापूर्वी आपण कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे आलो होतो. एवढ्या वर्षांनी पुन्हा येण्याचा योग आला. यानंतर पुन्हा येणे होईल की नाही हे सांगू शकत नाही, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/